‘मानव विकास’च्या ३८ फे-या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:33 AM2019-10-11T00:33:34+5:302019-10-11T00:33:51+5:30
येथील एसटी महामंडळाच्या आगारात मानव विकासच्या एकूण २१ बसेस आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव या तीन तालुक्यात एकूण २७२ फेºया रोज होतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे रोजच जवळपास ३० ते ५० फेºया रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मात्र शाळकरी विद्यार्थिनी व प्रवाशांची हेळसांड होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील एसटी महामंडळाच्या आगारात मानव विकासच्या एकूण २१ बसेस आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव या तीन तालुक्यात एकूण २७२ फेºया रोज होतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे रोजच जवळपास ३० ते ५० फेºया रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मात्र शाळकरी विद्यार्थिनी व प्रवाशांची हेळसांड होत आहे.
हिंगोली आगाराचे आगारप्रमुख या तीन दिवसांत एकदाही आगारात दिसून आले नाहीत, असे सांगितले जात आहे. तर आज ते मानव विकासच्या बैठकीमध्ये होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरु असल्याचे दिसून आले. गुरुवारी आगाराच्या दप्तराची पाहणी केली असता. मानव विकास बसच्या बुधवारच्या ३८ फेºया रद्द झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार रोजचाच आहे. शासन मानव विकासअंतर्गत विविध बाबींवर मोठा खर्च करते, मात्र येथील आगारप्रमुखांच्या उदासीनतेमुळे या विद्यार्थिनींना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
मानव विकास बस कधीच नियोजित वेळेत धावत नाहीत. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयात पोहचण्यास नेहमीच विलंब होतो. याप्रकरणी एसटी महामंडळाकडे अनेक तक्रारी करुनही गेंड्याची कातडी परिधान केलेले प्रशासन दखल घेत नाहीत. उलट या तक्रारींना उत्तर न देताच केराची टोपली दाखविली जाते. वारंवार तक्रारी करुन विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लात आहे. एकंदरीत आगारप्रमुखांच्या नियंत्रणाअभावी हिंगोली आगाराचा कारभार ढेपळाल्याचे दिसून आले. याकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष देऊन मनमानी कारभार थांबविण्याची मागणी प्रवासी व विद्यार्थिनींतून होत आहे.
याप्रकरणी आगारप्रमुख प्रे.भी.चौथमल म्हणाले, बसेसच्या फेºया रद्द होण्याचे कारण संबंधित कर्मचाºयांना विचारल्याशिवाय सांगता येणार नाही. मानव विकास बसच्या फेºया उद्या माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.