डिकीतून ३० हजार रुपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:43 AM2018-08-20T00:43:28+5:302018-08-20T00:43:41+5:30

केतून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवून दुकानाकडे जाताना चोरट्यांनी ३० हजार रुपये लांबविले. ही घटना वसमत येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

 By 30,000 rupees for Dikit | डिकीतून ३० हजार रुपये लांबविले

डिकीतून ३० हजार रुपये लांबविले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : बँकेतून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवून दुकानाकडे जाताना चोरट्यांनी ३० हजार रुपये लांबविले. ही घटना वसमत येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. वसमत येथील चेतन सारडा यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ३० हजार रूपये होते. वसमत शहरातील युनियन बँक परिसरात पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी सारडा यांच्या दुचाकीच्या डिकीतील नजर चुकवून तीस हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सारडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास जमादार चव्हाण करत आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस बँक परिसरात पाळत ठेऊन रोकड लंपास केल्याच्या घटनेत वाढ होत आहे.
गुंडा येथे अल्पवयीन मुलीचा नियभंग
हट्टा : वसमत तालुक्यातील गुंडा येथे १७ आॅगस्ट रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील गुंडा येथे अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक आटोपून मुलगी घराकडे जात असताना आरोपीने सदर मुलीचा विनयभंग केला.
याप्रकरणी आरोपी उत्तम संतराम थोरात (रा.गुंडा) याच्याविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title:  By 30,000 rupees for Dikit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.