रोहयोच्या कामांवर ३२ हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:49 PM2018-03-10T23:49:28+5:302018-03-10T23:49:34+5:30
एकीकडे हाताला कामच मिळत नसल्याचा आरोप करून मजूर जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर ३२ हजार ४८0 मजूर उपस्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकीकडे हाताला कामच मिळत नसल्याचा आरोप करून मजूर जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर ३२ हजार ४८0 मजूर उपस्थिती आहे.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजूर धरणे देत आहेत. त्यामुळे मागील सप्ताहातील मजूर उपस्थितीचा आढावा घेतला असता पंचायत समित्यांच्या ५४४ कामांवर तब्बल २५ हजार ४६0 तर यंत्रणांच्या १७६ कामांवर ७0२0 मजूर उपस्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे.
यामध्ये पंचायत समित्यांचा विचार केल्यास हिंगोलीत १९५ कामांवर ८९५२, कळमनुरीत १६0 कामांवर ७४२५, सेनगावात ४७ कामांवर २२३३, वसमतला ३0 कामांवर १२२८ तर औंढा नागनाथ तालुक्यात ११२ कामांवर ५६२२ मजूर उपस्थिती होती. इतर यंत्रणांच्या कामांमध्ये हिंगोलीत १४ कामांवर ६२६, कळमनुरीत ५५ कामांवर २४१८, सेनगावात २९ कामांवर १३६४, वसमतला ६६ कामांवर ९३२ तर औंढ्यात १२ कामांवर १६८0 मजूर उपस्थिती आहे.
एकीकडे कामे करण्याची मजुरांची तयारी वाढत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे कामे सुरू करण्यास मात्र टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. हे विरोधाभासी चित्र टाळण्यासाठी प्रशासनाने संबंधित सर्व यंत्रणांना सक्त सूचना देण्याची गरज आहे. जिल्हा कचेरीसमोर मजूर धरणे देत असतानाही प्रशासनाची ढिम्न गतीच कायम राहात असल्यास ही गंभीर बाब आहे.