हिंगोलीत नवे ३३ रुग्ण; तब्बल ७ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:40+5:302021-05-27T04:31:40+5:30
अँटिजन चाचणीत जिल्ह्यात २९५ पैकी केवळ २ रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात इसापूर येथे एक व सेनगाव परिसरात ...
अँटिजन चाचणीत जिल्ह्यात २९५ पैकी केवळ २ रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात इसापूर येथे एक व सेनगाव परिसरात कवरदरी येथे एक बाधित आढळला. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात जयपूर १, भिरडा १, माळधामणी ३, ग्रामीण पोलीस ठाणेजवळ १, माळहिवरा १, सरस्वतीनगर १, वैजापूर १ असे ९ रुग्ण आढळले. औंढा परिसरात औंढा १, रुपूर १, सिद्धेश्वर ३, जामगव्हाण १, जवळा बाजार १ असे ७ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात डिग्रस १, माळधामणी १, नाईकवाडी गल्ली १ असे ३ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात जांभरुण १, सुलदली १, साखरा १ असे ३ रुग्ण आढळले. वसमत परिसरात मोहम्मदपूरवाडी १, लोन १, गणेशपेठ १, पिंपळगाव कुटे ३, सोमठाणा १ व वसमत २ असे ९ रुग्ण आढळले. आज बरे झाल्याने ५९ जणांना घरी सोडले. यात हिंगोली २४, कळमनुरी ९, औंढा २, सेनगाव ३, वसमत ५, लिंबाळा १६ अशी संख्या आहे.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ५११ रुग्ण आढळले. यापैकी १४ हजार ६९९ जण बरे झाले; तर सध्या ४६७ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १८० जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर, तर अतिगंभीर २५ जण बायपॅप मशीनवर आहेत.
सात कोरोना रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात सात कोरोना रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. यात जिल्हा रुग्णालयात मरसूल, वसमत येथील ६३ वर्षीय पुरुष, धनगरवाडी, सेनगाव येथील ६५ वर्षीय महिला, जयपूर, सेनगाव येथील ७० वर्षीय पुरुष, तर सेनगावचा ६० वर्षीय पुरुष अशा चौघांचा मृत्यू झाला, तर नवीन कोविड सेंटरमध्ये साबलखेडा, सेनगाव येथील ५० वर्षीय पुरुष, कळमनुरी रुग्णालयात कळमनुरीचा ६५ वर्षीय पुरुष व वसमत रुग्णालयात वसमतच्याच ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.