३,४८,०६९ बालकांना दिली जाणार जंतनाशक गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:36 AM2021-02-17T04:36:04+5:302021-02-17T04:36:04+5:30
हिंगोली: जिल्हाभरात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गंत १ मार्च २०२१ रोजी १ ते १९ वर्षे वयोगटातील ३४८०६९ बालकांना जंत नाशकाची गोळी ...
हिंगोली: जिल्हाभरात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गंत १ मार्च २०२१ रोजी १ ते १९ वर्षे
वयोगटातील ३४८०६९ बालकांना जंत नाशकाची गोळी दिली जाणार आहे. यानिमित्त १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन व कोविड लसीकरणसंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच १ मार्च रोजी जंतनाशक मोहिमेअंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटांतील बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंगणवाडीतील ९०,८६५, शाळेतील २,४९,६३२, शाळाबाह्य लाभार्थींची संख्या ७,५७२ असल्याची माहिती डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी दिली. यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, आयएफएम सुनील मुन्नेश्वर, आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, शेख मुनाफ आदी उपस्थित होते.
अशी दिली जाणार जंतनाशक गोळी
----------
जिल्ह्यातील १२९० खासगी व सरकारी शाळा असून ११९२ अंगणवाडी आहेत. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटांतील एकूण लाभार्थींची संख्या ३,४८,०६९ आहे. अंगणवाडीतील बालकांना गोळी बारीक पावडर करून देण्यात येणार आहे. अंगणवाडीत न जाणाऱ्या व शाळा बाह्य लाभार्थींना अंगणवाडीत गोळ्या देण्यात येणार आहेत. गोळीचा डोस वयोगटानुसार देण्यात येणार असून, १ ते २ वर्षे (२०० मिलीग्रॅम) अर्धी गोळी, २ ते १९ वयोगटांतील लाभार्थींना पूर्ण एक गोळी (४०० मिलीग्रॅम) देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थांना गोळी घेता नाही आली, अशा लाभार्थांसाठी ८ मार्च रोजी गोळी देण्यात येणार आहे.
फोटो २६