३५०१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:53 PM2017-12-30T23:53:13+5:302017-12-30T23:53:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली:जिल्ह्यातील जे अल्पसंख्याक विद्यार्थी, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांना आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली:जिल्ह्यातील जे अल्पसंख्याक विद्यार्थी, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांना आता शिष्यवृत्ती लाभाची संधी मिळणार आहे. मात्र संबंधित मुख्याध्यापकांनी अशा विद्यार्थ्यांची अचूक माहिती शाळा लॉगिनवरून सरल प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही लाभ मिळालाच नाही, असे जिल्ह्यात एकूण ३ हजार ५०१ विद्यार्थी आहेत.
अल्पसंख्याक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती सन २००९-१० ते २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अद्याप शिष्यवृत्ती जमाच झाली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती ते ज्या शाळेत शिकत आहेत तेथील मुख्याध्यापकांनी सरल प्रणालीवर आॅनलाईन भरण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिल्या आहेत. सदर विद्यार्थ्यांची यादी संबधित शाळांना ई-मेलद्वारे ३० डिसेंबर रोजी पाठविाली आहे. संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण महाराष्टÑ राज्य पुणे यांनी व्हीसीद्वारे दिलेल्या आदेशानुसार संबधितांना सूचना देऊन कळविण्यात आले आहे. शिष्यवृत्तीची अशाप्रकारे माहिती तत्काळ भरून दिल्यास जे अल्पसंख्याक विद्यार्थी वर्षानु-वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांना लाभ मिळणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांची अचूक माहितीबाबत संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविल्याचे एम. ए. सय्यद यांनी सांगितले.
हिंगोली:विद्यार्थ्यांची माहिती सरलप्रणालीवर
\संबधित शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे बॅकखात्याची अचूक माहिती, बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधारकार्ड व पालकांचा दूरध्वनी क्रमांक अशाप्रकारे अचून माहिती आॅनलाईन भरून सादर केल्यास विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती सरलप्रणालीमध्ये शाळेच्या लॉग इनमध्ये तसेच संचालनालयाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. संबधित शाळांनी त्यांच्या सरल लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून माहिती भरायची आहे, असे सांगण्यात आले.