दहावीच्या परीक्षेस ३५६ विद्यार्थी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:23 AM2019-03-12T00:23:44+5:302019-03-12T00:24:03+5:30
औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ११ मार्च दहावीतील ३५६ विद्यार्थी तर बारावीचे ५ विद्यार्थी गैरहजर होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ११ मार्च दहावीतील ३५६ विद्यार्थी तर बारावीचे ५ विद्यार्थी गैरहजर होते.
जिल्ह्यात एकूण ५३ परीक्षा केंद्रांवरून दहावीची तर ३४ केंद्रांवरून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. ११ मार्च रोजी दहावीचा बिजगणित विषयाचा पेपर होता. १६ हजार ६७४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३५६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस गैरहजर होते. तर बारावीच्या वस्त्रशास्त्र विषयाच्या पेपरला २५१ पैकी २४६ विद्यार्थी उपस्थित होते. तर ५ विद्यार्थी बारावीच्या पेपरला गैरहजर राहिल्याची माहिती परीक्षा विभागाचे वडकुते यांनी दिली.