पहिल्याच पेपरला ३६६ जण अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:21 AM2018-02-22T01:21:57+5:302018-02-22T01:22:02+5:30
शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरुन घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ३६६ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरुन घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ३६६ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली
बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील १२ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते त्यापैकी ११ हजार ८४२ विद्यार्थ्यांनी २१ फेबु्रवारी रोजी इंग्रजीचा पहिला पेपर दिला तर ३६६ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्र पसिरात लहान-सहान हालचालींवर पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते. यासाठी पाच भरारी पथके तैनात केले होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी हिंगोलीतील सरजुदेवी शाळेला भेट दिली. तुम्मोड म्हणाले, सर्वच केंद्रावर केंद्र संचालकांसह पथकांनी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पडतील, याची काळजी घ्यावी. अधिकारीही विविध केंद्रांना भेटी देतील. यात कॉपीचा प्रकार आढळल्यास संबंधित वर्ग व केंद्रावरील लोकांवर कारवाई होऊ शकते. शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील केंद्रास भेट दिली. तर देवीदास इंगोले यांनी सवड येथे भेट दिली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्याचे शिक्षणाधिकारी चवणे यांनी सांगितले.