हिंगोलीत पर्यवेक्षिकांसाठी ३८ टॅब उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:47 PM2017-12-12T23:47:16+5:302017-12-12T23:47:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी आता टॅब उपलब्ध झाले आहेत. ३८ टॅब आले ...

38 tabs available for Hingoli supervisors | हिंगोलीत पर्यवेक्षिकांसाठी ३८ टॅब उपलब्ध

हिंगोलीत पर्यवेक्षिकांसाठी ३८ टॅब उपलब्ध

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला व बालकल्याण : हायटेक कारभाराकडे सुरू झाली वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी आता टॅब उपलब्ध झाले आहेत. ३८ टॅब आले असून ते पर्यवेक्षिकांना वितरित केले जाणार आहेत.
अंगणवाडी पर्यवेक्षिकांना दैनंदिन कामकाजासह मासिक अहवाल आॅनलाईन भरावे लागतात. त्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कॅफेवर जावे लागत होते. मात्र आता शासनाने त्यांना घरबसल्याच ही कामे करता यावीत, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात त्यांना असा टॅब दिला की, त्यावरून आधार नोंदणीही करता येणार आहे. अंगणवाडीत दाखल होणाºया बालकांचे आधार कार्ड काढण्यापासून ते त्याचे आधार लिंकिंग करण्यापर्यंतची कामे त्यावरच करता येणार आहेत. लवकरच त्यासाठी त्यांना आधार आॅपरेटरचे अधिकार बहाल केले जाणार आहेत. अंगणवाडी मतदनिस व कार्यकर्तींनाही भविष्यात टॅब दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यकर्तींनी आपल्या अंगणवाडीची माहिती त्यांना आॅनलाईन दिल्यानंतर त्यात इतर माहिती भरण्याचे काम पर्यवेक्षिकांना करणे सोपे जाणार आहे. तसेच मासिग प्रगती अहवाल, कुपोषणाची माहिती, पोषण आहारविषयक माहिती, मुलांची उपस्थिती आदी बाबींची माहिती एकदा बनवून ठेवली की, ती दुसºयावेळी केवळ अद्ययावत करण्याचेच काम शिल्लक राहणार आहे. याशिवाय वय व उंचीनुसार वजनाचा तक्ताही त्यांना आॅनलाईन सॉफ्टवेअरद्वारेच पाहणेही शक्य होणार आहे. काही सॉफ्टवेअर तयार झाले असून काहींवर अजून काम सुरू आहे.

Web Title: 38 tabs available for Hingoli supervisors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.