दोन रस्त्यांसाठी ३.८0 कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:57 PM2018-11-02T23:57:33+5:302018-11-02T23:57:46+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
साखरा- जयपूर- पानकन्हेरगाव- प्रजिमा- २७ या रस्त्यावरील साखरा या गावातील ० ते ९ कि.मी. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटसह बांधकामासाठी १.८० कोटी रुपये तर हराळ-वरखेडा-केंद्रा- गोरेगाव- माळहिवरा रामा २५८ या रस्त्यावरील गोरेगाव या गावातील कि.मी. २३/६०० ते २४/५०० या रस्त्याच्या काँक्रिट बांधकाम करण्यास २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
महाराष्टÑ शासनाचे रस्ते विभागाचे अवर सचिव सं.सु. घोडके यांनी पत्र के.आर.एम.आर. २०१८, प्र.क्र. १४० रस्ते - हे पत्र १ नोव्हेंबर रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांना कळविले आहे. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ.मुटकुळे यांची ही मागणी मान्य करून गोरेगावकरांना दिवाळी भेट दिली आहे.
वंचितांना न्याय-मुटकुळे
गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या गोरेगावकरांना नुकतीच २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. आता रस्त्यांचा प्रश्न सोडविल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.