कोरोनाचे नवे ३९ रुग्ण; पाच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:14+5:302021-05-29T04:23:14+5:30
हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत ३५१ पैकी ६ जण बाधित आढळले. हिंगोली परिसरात ११४ पैकी आमला येथे एक, वसमत परिसरात ...
हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत ३५१ पैकी ६ जण बाधित आढळले. हिंगोली परिसरात ११४ पैकी आमला येथे एक, वसमत परिसरात ७० पैकी हयातनगर व पांगरा शिंदे येथे प्रत्येकी १, सेनगाव परिसरात २४ पैकी सुलदलीत एक, औंढ्यात ३० पैकी शिरला येथे एक रुग्ण आढळला. कळमनुरीत ११३ पैकी एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात माळधामणी ५, पेडगाव १, भानखेडा १, नांदुसा १, जवळा १, फाळेगाव १ असे दहा रुग्ण आढळले. औंढा परिसरात हिवरा जाटू २, जडगाव ५, येडूद १, गेळेगाव १ असे ९ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात ढोलक्याची वाडी १, माळधामणी २, हिंगोली १, कळमनुरी ३, काळेवाडी १, वाकोडी १ असे ९ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात हाताळा १, येळेगाव १, वडहिवरा १, बाभूळगाव १, मकोडी १ असे ५ रुग्ण आढळले.
आज विविध कोविड सेंटरमधून बरे झालेल्या ६३ जणांना घरी सोडले. यात जिल्हा रुग्णालय ४२, कळमनुरी ७, औंढा १, सेनगाव १०, वसमत २ व लिंबाळा येथून एकास डिस्चार्ज दिला.
आजपर्यंत १५५९८ रुग्ण आढळले, तर यापैकी १४८४२ बरे झाले. सध्या ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ३५५ जणांचा मृत्यू झाला. दाखलपैकी १३७ ऑक्सिजनवर तर अतिगंभीर २३ बायपॅपवर आहेत.
पाच जणांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात एनटीसीतील ७६ वर्षीय पुरुष, शिवणी येथील ३८ वर्षीय पुरुष, पिंपळखेडा येथील ६० वर्षीय महिला व लोहरा, औंढा येथील ६० वर्षीय महिला असा चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर नवीन कोविड सेंटरमध्ये काकडधाबा येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.