हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; परभणी, नांदेडमध्येही जाणवले हादरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 07:52 AM2024-07-10T07:52:55+5:302024-07-10T07:53:29+5:30
वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे.
- इस्माईल जाहगीरदार
वसमत (जि. हिंगोली): बुधवारी सकाळी ७.१५ वाजेदरम्यान भूकंपाचा धक्का बसला. यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क केला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे.गत सहा वर्षा पासुन तालुक्या सह जिल्हा भरात अनेक भुकंपाचे धक्के जाणवले,२१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ४.५ रिश्टर स्केलचा धक्का बसला,त्या नंतर त्याच तिवृतेचा धक्का १० जुलै रोजी सकाळी ७.१५ मि ४.५ रिश्टर स्केलचा धका जाणवला आहे, मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
जिल्हा हादरला...
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे,वापटी, परीसर भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सहा वर्षांपासून धक्का...
गत पाच ते सहा वर्षा पासुन भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का होता त्याच तिवृतेचा बुधवार रोजी सकाळी ७.१५ मि ४.२ रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे.दरम्यान, हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण बुधवारी झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवले.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..
बुधवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे,अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.