हिंगोली जिल्ह्यात ४३० गंभीर गुन्हे; २१५ आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:50+5:302021-01-08T05:38:50+5:30
हिंगोली: गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये दाखल गंभीर गुन्हे ४३० होते. या प्रकरणी २१५ गुन्हेगारांना अटकही करण्यात आली आहे. २०२० ...
हिंगोली: गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये दाखल गंभीर गुन्हे ४३० होते. या प्रकरणी २१५ गुन्हेगारांना अटकही करण्यात आली आहे. २०२० मध्ये ११ शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरीला गेल्याने या प्रकरणाने खळबळ माजवून दिली होती.
जबरी चोरी, दरोडा, महिलांच्या गळ्यातील चैन चोरी करणे, दिवसा व रात्री घरफोडी करणे, मोटारसायल अशा ४३० घटना घडल्या. यातील २०१ गुन्हे उघड केले. नोव्हेंबर २०२० मध्ये अनिल भोसले व त्याच्या सहकाऱ्याकडून बाळापूर हद्दीतील वरुडतांडा, तोंडापूर, वसमत ग्रामीण हद्दीतील चांगेफळ, शास्त्रीनगर येथील घरे फोडली होती. १४ तोळे सोने व पाऊण किलो चांदी त्याच्याकडून हस्तगत केली. गतवर्षी खुनाच्या ३२ घटना घडल्या. या प्रकरणी २६ घटनेचा तपास लावून ५३ जणांना अटक केली. अत्याचाराचे २८ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ जणांना अटक केली. दंग्याची १३३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी ३०१ जणांना अटक केली. फसवणूक केल्याप्रकरणी ३२ गुन्हे दाखल केले होते. यातील ३० आरोपींना अटक केली.
लाॅकडाऊनमध्ये ११ बैलजोड्या चोरीला
कोरोना आजारामुळे सर्वत्र २३ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू होते. या दरम्यान, शेतकऱ्यांच्या ११ बैलजोड्या चोरीला गेल्या. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. एलसीबीने याचा तपास केला व १३ जणांवर गुन्हे दाखल केले. एलसीबीने कसून चौकशी केली तेव्हा आरोपींनी बैल कापल्याची कबुली दिली. आरोपीकडून मुद्देमालाची रक्कम वसूल करून ती रक्कम संबंधित ११ शेतकऱ्यांना सुपूर्द केल्याचे पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी सांगितले.
वर्षभरात ११ जणांना तडीपार केले
सन २०२० या वर्षात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ११ जणांना हिंगोली जिल्ह्याबाहेर दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. ही माहिती हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.