गारपीटग्रस्तांसाठी ४.७ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:13 AM2018-02-21T01:13:03+5:302018-02-21T01:13:06+5:30

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

 4.7 crores for hailstorm affected people | गारपीटग्रस्तांसाठी ४.७ कोटींचा प्रस्ताव

गारपीटग्रस्तांसाठी ४.७ कोटींचा प्रस्ताव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या नुकसानीबाबत शेतकºयांना मदतीसाठी ४.७३ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात ३३ ते ५0 टक्के व ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे वेगवेगळे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
यंदा रबीच्या काढणीच्या हंगामातच गारपिटीने हल्लाबोल केल्याने शेतकºयांचे या पिकांसह फळबागा, भाजीपाला आदीचे नुकसान झाले आहे. यात ३३ ते ५0 टक्के नुकसान झालेले कळमनुरी, सेनगाव व वसमत तालुक्यात जिरायतीचे एकूण ५0१६ शेतकºयांचे क्षेत्र ३२९४ हेक्टरवर नुकसान असून २.२४ कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव आहे. यात ज्वारी १३२ हे., तूर ३.३, हरभरा-८0२.८ हेक्टर तर इतर २३५६ हेक्टर क्षेत्र आहे. फळपिके सोडून इतर बागायती पिकांसाठी हिंगोली, कळमनुरी, सेनगाव व वसमत तालुक्यातील ३३७३ शेतकºयांच्या १२६९ हेक्टरसाठी १.७१ कोटींचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात भाजीपाला १0३ हेक्टर, गहू ११४२ हेक्टर, कांदा ४.६ हेक्टर, केळी-२.६ तर करडई १७ हेक्टर आहे. कळमनुरी व हिंगोलीत ४६ शेतकºयांच्या २९ हेक्टर फळबागांसाठी ५.३२ लाखांचा प्रस्ताव आहे. यात पपई, डाळिंब, मोसंबी, आंबा, चिकू, संत्रा, लिंबोनीचा समावेश आहे.
८0६ हेक्टरचे ५0 टक्क्यांवर नुकसान
जिल्ह्यात ८0६ हेक्टरवर ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती पिकांमध्ये १0७७ शेतकºयांचा ६३७ हेक्टरचे ४३.३६ लाखांचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात ज्वारी-९२.२९ हेक्टर, हरभरा ५३७ हेक्टर व इतर ८.५ हेक्टरचा समावेश आहे. फळपिके सोडून बागायतीचे ५८६ शेतकºयांचे १५७ हेक्टरचे नुकसान झाले असून २१.२६ लाखांचा भरपाईचा प्रस्ताव आहे. यात कळमनुरी व वसमत तालुक्यात भाजीपाला ६.२ हेक्टर, गहू १४१ हेक्टर, केळी १.२ हेक्टर आहे. तर फळबागांचे कळमनुरी व वसमत तालुक्यातील २९ शेतकºयाचे ११.२ हेक्टरच्या नुकसानीस २ लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे.
५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या १२५९ आहे. त्यात जिरायतीस ६८00, बागायतीस १३५00 तर फळपिकांस १८000 याप्रमाणे प्रस्ताव पाठविला. कळमनुरीत ४९.५५ तर वसमतला १७.१0 लाखांच्या भरपाईचा हा प्रस्ताव आहे.
३३ ते ५0 टक्क्यांमध्ये ८१६६ शेतकºयांचे ४५९३ हेक्टर क्षेत्र असून त्याच निकषाप्रमाणे भरपाईचा हिंगोली १.३७ कोटी, कळमनुरी-२.३४ कोटी, सेनगाव २२.११ लाख, वसमतचा ५.९९ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

Web Title:  4.7 crores for hailstorm affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.