मग्रारोहयोत तब्बल ४७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:38 AM2018-07-04T00:38:42+5:302018-07-04T00:39:19+5:30

मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या धाकापोटी मूकपणे सहन केले जात आहे.

 47 thousand laborers in Magrorohyot | मग्रारोहयोत तब्बल ४७ हजार मजूर

मग्रारोहयोत तब्बल ४७ हजार मजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या धाकापोटी मूकपणे सहन केले जात आहे.
मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या मे महिन्यात घटली होती. कडक उन्हामुळे परिणाम झाला की काय कोण जाणे? मात्र साप्ताहिक मजुरांची संख्या दहा ते पंधरा हजारांच्या घरात आली होती. आता जूनमध्ये पावसाळ्याचा महिना असतानाही मजुरांची संख्या वाढली आहे. यामध्ये यंत्रणांच्या ६६ कामांवर ६११0 मजूर आहेत. यात प्रामुख्याने वनविभागाच्या कामांचा समावेश आहे. यात हिंगोलीत १0 कामांवर ५७२, कळमनुरीत १८ कामांवर १३0२, सेनगावात १९ कामांवर १७३८, वसमतला १0 कामांवर १४३८ तर औंढ्यात ९ कामांवर १0६0 मजूर उपस्थिती आहे.
उन्हाळ्यात बाहेर गावी कामे करून अनेक मजूर पावसाळ्याच्या तोंडावर गावातच शेतीकामे उपलब्ध होत असल्याने गावाकडे परततात. मात्र आता यांत्रिकीकरणामुळे गावातही मजुरांच्या हाताला फारशी कामे राहिली नाहीत. बैलजोडीवर पेरणी करणाºयांना मात्र मोठ्या प्रमाणात मजूर लावावे लागतात. परंतु शेतीत कामे कमी असल्याने मग्रारोहयोची मजूर उपस्थिती वाढावी, हेही कारण असू शकते. मात्र त्याची चाचपणी प्रशासनाकडून होते का? हा प्रश्न आहे.
हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींना अचानकच मग्रारोहयोची कामे करण्याचा उल्हास आल्याचे पहायला मिळत आहे. यात हिंगोली तालुक्यात ४५ कामांवर ८६४२, कळमनुरीत ८0 कामांवर ४९५३, सेनगावात ९५ कामांवर १३७७६, वसमतला ३ कामांवर ४४ तर औंढा नागनाथ तालुक्यातील १९२ कामांवर १४ हजार १३८ मजूर असल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. कायम नकारघंटा वाजवणाºया पंचायत समित्यांचे पावसाळ्याच्या तोंडावर मनपरिवर्तन झाल्याचा सुखद धक्का अनेकांना बसला आहे.

Web Title:  47 thousand laborers in Magrorohyot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.