आगीत ५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:22 AM2018-08-13T01:22:13+5:302018-08-13T01:22:27+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली.
सेनगाव येथील पंचायत समितीच्या गोडाऊनला महाराष्ट्र बंद च्या दिवशी आग लागली आगी या आगीमध्ये महसूल विभागाने २००९-१० वनराई बंधारे करण्यासाठी सिमेंटच्या अंदाजे ८० ते ९० हजार रिकाम्या गोण्या तहसीलदारांमार्फत या गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. या गोण्या आगीत जळून पूर्णत: खाक झाल्या आहेत. हातपंप दुरुस्ती साहित्य जळाले आहे. त्यांचे अंदाजे १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे . तीन दिवसापासून ही आग विझविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. रविवारी ही आग आटोक्यात आली. एकूण नुकसानी संदर्भात विस्तार अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी सांगितले की आमच्याकडे वनराई बंधाऱ्याच्या रिकाम्या गोण्याची कोणतीही पोहोच पावती पंचायत समितीत आढळून आली नाही. या संदर्भात तत्कालीन महसूल अधिकाºयांवर प्रशासकीय कार्यवाही सुद्धा झालेली आहे. आगीत ह्याच गोण्या जळाल्या आहेत. असे एकूण ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आमदार रामराव वडकुते यांनी रविवारी पंचायत समितीच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. एकूण नुकसानीची माहिती घेतली. या वेळी गटविकास अधिकारी के.व्ही.काळे, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, फौजदार जाधव, सहायक गटविकास अधिकारी बी.जी.पंडित, राष्ट्रवादीचे रवींद्र गडदे उपस्थित होते.