जिल्ह्यात ५ नवे रुग्ण; ५ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:39 AM2021-01-08T05:39:08+5:302021-01-08T05:39:08+5:30
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी वसमत १७, सेनगाव २०, कळमनुरी १२, औंढा ७, अशी एकूण ५६ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. ...
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी वसमत १७, सेनगाव २०, कळमनुरी १२, औंढा ७, अशी एकूण ५६ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यापैकी एकही बाधित आढळला नाही, तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत विद्यानगर १, संत नामदेवनगर १, वसमत तालुक्यात पुयनी २, कुरुंदा १, असे पाच रुग्ण आढळून आले आहेत, तर हिंगोली १, वसमत ४ अशा पाच जणांना बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ३,५६४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३,४४९ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ६१ रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डात दाखल असलेल्यांपैकी ६ जण ऑक्सिजनवर, तर १ जणास अतिगंभीर असल्याने बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.