५१२ दिव्यांगाना यूडीआयडी कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:36 PM2017-12-03T23:36:49+5:302017-12-03T23:36:56+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी जि. प. समाज कल्याण विभागातर्फे तालुका स्तरावर शिबीर राबविण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार वर्षांत १० हजार ५९५ लाभार्थ्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर ५१२ दिव्यांगाना ‘यूडीआडी’ कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अपंग असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीस येणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांसाठी जि. प. समाज कल्याण विभागातर्फे तालुका स्तरावर शिबीर राबविण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यातील दिव्यांगाची योजनासह रुग्णालयातून प्रमाणपत्र घेण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे जि. प. समाज कल्याण विभागाच्या अपंग विकास महामंडळाला स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत आलेला निधी १०० टक्के खर्च केला जाणार आहे. तर अपंग यूडीआयडी कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांसाठी प्रस्ताव दाखल करणे सोपे होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड काढावेत यासाठी पाचही तालुक्यातील गटविकास अधिकाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच रुग्णालयातून काढलेले प्रमाणपत्र महा- ई-सेवा केंद्रावरुन आॅनलाईन दाखल केल्यानंतर त्या- त्या दिव्यांगांना आपापल्या गावातच युडीआयडी कार्ड मिळण्यास मदत होणार आहे. सर्व योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे.
तसेच आता दिव्यांगाना लाभ घेण्यासाठी यूडीआडी कार्डही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्ड जास्तीत-जास्त दिव्यांगांनी काढण्याचे आवान जि. प. समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.