वसमतमध्ये पुन्हा लांबविली शिक्षकाची ५४ हजारांची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:21 AM2018-08-21T01:21:14+5:302018-08-21T01:21:44+5:30
येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील बँकेतून पैसे काढून बाजारात गाडी उभी करून मक्याचे कणीस घेणाऱ्या मुख्याध्यापकांची पैशाची बॅग चोरट्याने लांबवली. वसमत शहरातील मामा चौकात ही घटना घडली.
वसमत तालुक्यातील जि.प. पळशी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर निवृत्ती राऊत (रा. वाखारी) यांनी सोमवारी बँकेतून ५० हजार काढले हे ५० हजार व जवळील चार हजार असे ५४ हजार रुपये बॅगमध्ये ठेवून ते घराकडे निघाले. मामा चौकात गाड्यावर मक्याचे कणीस घेण्यासाठी ते थांबले पैशाची बॅग दुचाकीवर अडकवून ते कणीस घेण्यासाठी थांबले चोरट्यांनी ती बॅग लांबवली असल्याची लेखी तक्रार त्यांनी वसमत पोलिसांकडे दिली. दोन दिवसांपुर्वीच ३० हजार रुपयाची बॅग लांबवल्याची घटना घडली होती. शहरात पाळत ठेवून पैशाच्या बॅग लांबवणारी टोळी सक्रीय झाल्याचे चित्र समोर येत आहे. त्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हाण पोलिसांसमोर आहे.