हिंगोली जिल्ह्यातील ५६ शिक्षक कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:06 AM2018-06-06T00:06:08+5:302018-06-06T00:06:08+5:30
जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी उपस्थित करुन घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी उपस्थित करुन घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी उपस्थित करुन घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे म. विभाग प्रमुख पंडित नागरगोजे यांनी शिक्षकांच्या कार्यमुक्तसाठी प्रयत्न केले. अखेर जिल्ह्यातील ५६ शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले. २८ मे हिंगोलीसह राज्यातील २२ जिल्ह्यातील शिक्षकाच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. बदलीच्या दुसºयाच दिवशी सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या शाळेवर रुजू करुन घेण्याचे आदेशही होते. जिल्ह्यातील बदली झालेल्या १४५२ पैकी ५६ शिक्षकांना कार्यमुक्त केले नव्हते. अखेर उशिराने का होईना ही प्रक्रिया पार पडली.