हिंगोली जिल्ह्यात ५७७० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:47 PM2017-12-03T23:47:32+5:302017-12-03T23:47:39+5:30
जिल्ह्यामध्ये राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत १ ते ३० डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणाºया मोहिमेमध्ये ३ डिसेंबर पर्यंत तब्बल ५ हजार ७७० रुग्णांची मौखिक तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाºयाकंडुन मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यामध्ये राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत १ ते ३० डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणाºया मोहिमेमध्ये ३ डिसेंबर पर्यंत तब्बल ५ हजार ७७० रुग्णांची मौखिक तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाºयाकंडुन मिळाली आहे.
तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामावर प्रकाश टाकण्यासाठी हि मोहिम राबविण्यात येत आहे. या पदार्थाचे सेवन केल्याने आरोग्यावर होणाºया दुष्पपरिणामाची जनजागृती केली जात आहे. हे संपूर्ण दुष्पपरिणाम लक्षात आणून देऊन ३० वर्ष वयोगटावरील स्त्री आणि पुरूषांची मौखिक तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये महिनाभर सुरु राहणार आहे. त्यामुळे त्या- त्या आरोग्य विभागांतर्गत येणाºया ग्रामस्थांनी आपली मौखिक तपासणी करून घ्यावी. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातही तपासणी सुरुच आहे.
तंबाखुचे सेवन शरीरास मोठ्या प्रमाणात घात करते. तंबाखुच्या सेवनाने विविध मौखिक आजार उद्भवतात. तंबाखु हा सर्वाधिक दक्षिण व मध्ये अमेरीकेत सापडतो. तर अमेरीका खंडाकडून युरोप खंडात तंबाखुचा प्रसार झालेला आहे. पोर्तुगिज व्यापाºयांकडून भारतात पहिल्यांदाच तंबाखुचे आगमन झाले आहे.
प्रथम राजे महाराजे तंबाखुचे सेवन करत असत नंतर त्याचे सर्व सामान्यांनीही सेवन सुरु केले. तसे तंबाखचे सेवने विडी, धुमती, सिगरेट, पाईप, सिगार, हुकली, चिलीम, हुक्का, चुट्टा याद्वारे होते. तसेच तासंतास तोंडात एकाच ठिकाणी तंबाखु ठेवल्याने मुख आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. विशेष म्हणजे सर्वच प्रकाराने केलेले सेवनही शरीरासाठी घातक ठरु शकते. तसेच बºयाच व्यक्ती निष्क्रिय धुम्रपान करीत असल्यानेही त्याचा आजुबाजुला बसलेल्या इतरांना त्रास होतो. तर पालकांकडुन होणाºया धुम्रपानामुळे पाल्यांना त्रास होतो, असे डॉक्टरांनी सांगितले.