जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५९ रुग्ण; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:48+5:302021-05-20T04:31:48+5:30

आज अँटिजन चाचणीत १४८ पैकी १३ जण बाधित आढळले आहेत. यात हिंगोली परिसरात दाटेगाव १, नवीन पोलीस वसाहत १, ...

59 new corona patients in the district; Death of four | जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५९ रुग्ण; चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५९ रुग्ण; चौघांचा मृत्यू

Next

आज अँटिजन चाचणीत १४८ पैकी १३ जण बाधित आढळले आहेत. यात हिंगोली परिसरात दाटेगाव १, नवीन पोलीस वसाहत १, वसमत परिसरात चौधरीनगर १, तेलगाव १, सेनगाव परिसरात सेनगाव २, रिधोरा १, हुडी १ कळमनुरी परिसरात सहयोगनगर ३, ब्राह्मण गल्ली १, बाळापूर १ असे रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गोविंदनगर १, पिंपरखेड १, सावरकरनगर ३, अकोला बायापास १, हिंगोली १, जामगव्हाण १, पांगरी १, भांडेगाव १, माळधामणी २, मंगळवारा १, खेर्डा १, इसापूर रमना २, हनकदरी १, पिंपळखुटा १, जलालधाबा १, जिजामातानगर १, चोंढी १, डिग्रस कऱ्हाळे १, सुलदली १, शेवाळा १, गोरेगाव १, पिंपरखेड १, ब्राह्मण गल्ली १, कोळसा १, पुसेगाव १ असे २९ रुग्ण आढळले.

वसमत परिसरात पळसगाव २, व्यंकटरमणानगर १ असे तीन, सेनगाव परिसरात कहाकर ५, सेनगाव १, हनकदरी १, सुलदली २ असे एकूण ९; तर कळमनुरी परिसरात झुनझुनवाडी १, चुंचा १, एसएसबी येलकी १, पेठवडगाव १, सिनगी १ असे एकूण ५ रुग्ण आढळले.

बुधवारी बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून ३७, कळमनुरीतून १०, औंढ्यातून ३, सेनगावातून ११, वसमतहून ५ व लिंबाळा येथून ३ अशा ६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ४९ रुग्ण झाले असून, त्यांपैकी १४ हजार १९९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण ५२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी २३० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे; तर २५ बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहेत.

चारजणांचा मृत्यू

हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात पेडगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा, वसमत उपजिल्हा रुग्णालयात सोमवार पेठच्या ४२ वर्षीय पुरुषाचा, पिंपळगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा, कळमनुरी येथील रुग्णालयात कनका येथील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: 59 new corona patients in the district; Death of four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.