जात वैधता पडताळणीत ५९४३ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:31 AM2018-05-05T00:31:54+5:302018-05-05T00:31:54+5:30
जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली.
हिंगोली येथे २१ नोव्हेंबर २०१६ पासून जिल्हा जात वैधता पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली. शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी असोत किंवा निवडणुकीतील उमेदवार व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींना विविध शासकीय कामांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्रांसाठी अर्जदाराला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे व वेळीच त्रुटींची पूर्तता केल्यास अर्ज लवकर निकाली काढल्या जाते, असा या कार्यालयाचा दावा आहे. शिवाय संबधित अर्जदाराला एसएमएसद्वारे वेळोवेळी कळविले जाते. तो मिळताच खात्री करून घेतल्यास व कागदोत्रांची पूर्तता केल्यास जात वैधता पडताळणीच्या कामात व्यत्यय येत नाही, अशी माहिती जात वैधता पडताळणी समितीचे उपायुक्त भारत केंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने या कामासाठी कार्यालयाचे खेटे घ्यावे लागातात. परंतु येथील रिक्त पदे, व अध्यक्ष नसल्यामुळे याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे. अधिक माहितीकरिता ६६६.ुं१३्र.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
अध्यक्षविना कामकाज : रिक्त पदांचे ग्रहण
मागील दीड वर्षापासून जिल्हा जातपडताळणी समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही. शिवाय येथील १ डीवायएसपीं, २ क्लार्क, १ स्टेनोग्राफर व १ शिपाई ही पदे रक्त आहेत. तरे एकूण ६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यावर कामकाज सुरू आहे.
जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अनुभवी शासकीय कर्मचाºयांचा अभाव आहे. त्यामुळे कार्यालयीन कामे करताना अडचणी येतात. शिवाय प्रक्रिया पार पाडताना अनेक चुकाही होतात.
भूल-थापांना बळी पडू नका- केंद्रे
४अर्जदारांनी कोणाच्याही भूल-थापांना बळी पडू नये, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. तसेच यादरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता वेळेत केल्यास पुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडल्या जाते. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणाकडेही आपली मूळ कागदपत्रे किंवा इतर कार्यालयीन कामे सोपवू नयेत. एकाच जातीचा दुसºया जातीत जाऊन जातपडताळणी करून लाभ घेणारे बोगस प्रकरणेही येतात. त्यामुळे योग्य पडताळणी केली जाते. याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. दोषी आढळून आल्यास वरिष्ठ कार्यवाही करतात.