रेल्वे स्थानकातील तपासणीत निघाले ६ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:40+5:302021-04-26T04:26:40+5:30
अकोला ते पूर्णा मार्गावरील हिंगोली रेल्वे स्थानक महत्वाचा थांबा आहे. येथून अनेक प्रवासी प्रवास करतात. कोरोना काळातही प्रवासी प्रवास ...
अकोला ते पूर्णा मार्गावरील हिंगोली रेल्वे स्थानक महत्वाचा थांबा आहे. येथून अनेक प्रवासी प्रवास करतात. कोरोना काळातही प्रवासी प्रवास करताना आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी स्थानिक आरोग्य विभागाच्या वतीने रेल्वे स्थानकावर कोरोना तपासणीसाठी पथक नियुक्त केले आहे. येथून जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांची ॲटीजेन तपासणी केली जात आहे. रविवारी एएनएम अनुपमा नारायण तिगोटे, आशा वर्कर अनिता चोंढेकर, सीमा सरकटे, आरोग्य सेवक वसंत पवार यांच्या पथकाने रेल्वे स्थानकावर दुपारपर्यंत २० प्रवााशांची तपासणी केली असता त्यात ६ प्रवासी कोरोना बाधित निघाले. कोरोनाबाधित निघालेल्या प्रवाशांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. बसस्थानकासह इतर ठिकाणी आरोग्य पथक नियुक्त करून कोरोना तपासणी केली जात आहे. आरोग्य पथकाला मदत व्हावी,यासाठी त्या त्या विभागातील कर्मचारीही मदतीला दिले आहेत. सर्वच विभागातील कर्मचारी, अधिकारी पुढाकार घेत असताना रेल्वे विभागाकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. येथे नियुक्त केलेल्या आरोग्य पथकाला रेल्वे विभागातील एकही कर्मचारी, अधिकारी मदतीला येत नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला थांबवून त्याची कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी आरोग्य पथकावरच आली आहे.
फोटो 25hnlp13 कॅप्शन : हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर नियुक्त केलेल्या ॲटीजेन तपासणी पथकातील आरोग्य कर्मचारी.