जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण; ६ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:59+5:302021-01-16T04:34:59+5:30
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी हिंगोली २, वसमत १२, सेनगाव २, कळमनुरी ८ अशा २४ ॲण्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर टेस्टद्वारे ...
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी हिंगोली २, वसमत १२, सेनगाव २, कळमनुरी ८ अशा २४ ॲण्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली ४, औंढा १, वसमत १ असे सहा रुग्ण आढळून आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड हिंगोली येथील ५ रुग्ण, वसमत येथील कोरोना केअर सेंटरमधील १ असे सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत एकूण ३ हजार ६२४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ हजार ४९८ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत एकूण ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांपैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर एका अतिगंभीर रुग्णाला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.