जिल्ह्यात कोरोनाचे नवे ६२ रुग्ण; ५५ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:33+5:302021-05-26T04:30:33+5:30
अँटिजन चाचणीत जिल्ह्यात ५७४ पैकी १८ जण बाधित आढळले. हिंगोली परिसरात आमला १, नर्सी १ असे दोन रुग्ण आढळले. ...
अँटिजन चाचणीत जिल्ह्यात ५७४ पैकी १८ जण बाधित आढळले. हिंगोली परिसरात आमला १, नर्सी १ असे दोन रुग्ण आढळले. वसमत परिसरात कुरुंदा येथे २ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात सेनगाव २, गोरेगाव २, सुलदली १, शिवणी १, उटी १, आजेगाव १ असे एकूण ८ रुग्ण आढळले. औंढा परिसरात तपोवन १, केळी तांडा १, चिंचोली १ असे ३ रुग्ण आढळून आले. कळमनुरी परिसरात चुंचा १, वारंगा १, बाळापूर १ असे ३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात सावरखेडा १, बेलवाडी २, रिधोरा १, नवीन पोलीस वसाहत १, अकोला बायपास २, सुलदली १, पोलीस क्वाटर्स १, मोप १, तलाबकट्टा १, पांगरी २, माळधामणी २, देवगल्ली १, हिंगोली १, भिरडा १, ब्रह्मपुरी १, रिधोरा १, गंगानगर १ असे २२ रुग्ण आढळले. औंढा परिसरात गोजेगाव १, करंजाळा १, जवळा बाजार १ असे तीन रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात वारंगा मसई १, कावड १, कळमनुरी ५, चुंचा २ असे ९ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात सेनगाव ५, वेलतुरा ३, आजेगाव १, खारकड १ असे १० रुग्ण आढळले. बरे झाल्याने आज ५५ जणांना घरी सोडले. यात जिल्हा रुग्णालयातून २९, कळमनुरीतून ९, औंढ्यातून ६, सेनगावातून ५, वसमतहून ४, लिंबाळा येथून २ जणांना घरी सोडले.
आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ४७८ रुग्ण आढळले. त्यापैकी १४ हजार ६४० रुग्णांना डिस्चार्ज दिला. सध्या ५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १७८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. तर २६ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.
तिघांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने आज तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही जिल्हा रुग्णालयात दाखल होते. यात कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील ७० वर्षीय पुरुष, बोल्डा येथील ५५ वर्षीय पुरुष, दाटेगाव येथील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकूण मृत्यूची संख्या ३३८ वर पोहोचली आहे.