डीपीसीसाठी ६५ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:21 AM2017-08-02T00:21:53+5:302017-08-02T00:21:53+5:30

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शेवटच्या दिवशी एकच गर्दी झाली होती. ६५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे बिनविरोध निवडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

65 nomination papers for DPC | डीपीसीसाठी ६५ उमेदवारी अर्ज दाखल

डीपीसीसाठी ६५ उमेदवारी अर्ज दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शेवटच्या दिवशी एकच गर्दी झाली होती. ६५ अर्ज दाखल झाले.
त्यामुळे बिनविरोध निवडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या २४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात जि.प.तून २0 जागा निवडून द्यावयाच्या असून नगरपालिकेतून ३ तर १ नगरपंचायतींतून आहे. यात प्रवर्गनिहाय व पन्नास टक्के महिला आरक्षणही आहे. त्यातच ज्या प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना त्याच प्रवर्गात अर्ज करता येणार आहे. या सर्व शक्यता पडताळून या समितीवर कोणाला पाठवायचे, हे सर्वच पक्षांना ठरवावे लागेल, त्यानंतर बिनविरोधचे नियोजन करणे शक्य आहे.

Web Title: 65 nomination papers for DPC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.