जिल्ह्यात ६.५० मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:55+5:302021-07-24T04:18:55+5:30

यामध्ये हिंगोली तालुक्यात २.९० मिमी, कळमनुरी ६.७० मिमी, वसमत १३.३० मिमी, औंढा ५.३० मिमी, सेनगाव ३.४० मिमी असे तालुकानिहाय ...

6.50 mm rainfall in the district | जिल्ह्यात ६.५० मिमी पाऊस

जिल्ह्यात ६.५० मिमी पाऊस

googlenewsNext

यामध्ये हिंगोली तालुक्यात २.९० मिमी, कळमनुरी ६.७० मिमी, वसमत १३.३० मिमी, औंढा ५.३० मिमी, सेनगाव ३.४० मिमी असे तालुकानिहाय पर्जन्य झाले. गुरूवारी दिवसभर तुषार सिंचन प्रमाणे पावसाचे थेंब कोसळत होते. तर काही भागात अधून मधून चांगल्या सरी बरसल्या. २३ रोजीही दिवसभर ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ६१ टक्के पर्जन्यमान झाले. यात हिंगोली ५४.९३ टक्के, कळमनुरी ६२.८६ टक्के, वसमत ५९ टक्के, औंढा ७५ टक्के, सेनगाव ६० टक्के असे पर्जन्यमान झाले आहे.

येलदरी ६९ तर सिद्धेश्वर ६१ टक्क्यांवर

सतत होत असलेल्या पावसामुळे यंदा आधीच अर्ध्यावर भरलेली धरणे पूर्ण संचयाकडे वाटचाल करीत आहेत. अजून पावसाळ्याचे बराच काळ शिल्लक असल्याने ही धरणे भरतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. येलदरी धरणात एकूण ६८८ दलघमी पाणीसाठा आहे. यापैकी ५६३ दलघमी उपयुक्त साठा आहे. हे प्रमाण ६९.५७ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी ६५ टक्के साठा होता. सिद्धेश्वर धरणात सध्या एकूण २२० दलघमी पाणीसाठा आहे. यापैकी ५०.१८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. हे प्रमाण ६१.९८ टक्के असून गतवर्षी याच दिवशी ५४.९५ टक्के एवढा जलसाठा होता.

इसापूर ही ६३ टक्क्यांवर

हिंगोली जिल्ह्याच्या शेजारी असलेले आणखी एक मोठे असलेले इसापूरचे धरण ही ६३.५७ टक्के भरले आहे. या धरणात एकूण ९२७.८५ दलघमी पाणीसाठा आहे. तर उपयुक्त साठा ६१२ दलघमी एवढा आहे. गतवर्षी याच दिवशी या धरणात अवघा ४८ टक्के जलसाठा होता. त्यामुळे यंदा हेही धरण पूर्ण संचयाकडे वाटचाल करताना दिसत आहे.

Web Title: 6.50 mm rainfall in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.