६५०० सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:34 AM2018-04-01T00:34:21+5:302018-04-01T00:34:21+5:30
जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी शासनाकडून ५० लाखांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती जि. प. समाज कल्याण विभागाने दिली. त्यामुळे २०१७-१८ मधील सावित्रीच्या लेकींना येत्या दहा दिवसांत लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी शासनाकडून ५० लाखांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती जि. प. समाज कल्याण विभागाने दिली. त्यामुळे २०१७-१८ मधील सावित्रीच्या लेकींना येत्या दहा दिवसांत लाभ मिळणार आहे.
शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, व पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे हा उद्देश समोर ठेवत शासनाकडून जि. प. समाजकल्याण तर्फे मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. सदर योजनेत हिंगोली जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
मार्च एण्डींगच्या बँकेतील कामांमुळे विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यास विलंब झाला. परंतु येत्या दहा दिवसांत शिष्यवृर्त्ती रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. तर शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील शिष्यवृत्ती योजना यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मेट्रीकपूर्व, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली. तसेच काही बँकेत सदर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरू आहे. बँकेतील मार्चएण्डची कामे आटोपताच उर्वरीत विद्यार्थ्यांच्याही खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाईल. शासनाकडून १ कोटी ५ लाख रूपये समाज कल्याण तर्फे बँकेत वर्ग करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरूच आहे.
२०१७-१८ या वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी विद्यार्थिनींना दरमहा ६० रूपयांप्रमाणे दहा महिन्यांचे ६०० रूपये तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० वीत शिक्षण घेणाºया मुलींना दरमहा १०० रूपये याप्रमाणे १ हजार रूपये, शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
२०१७-१८ मधील सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. मेट्रीकपूर्व व अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेस शासनाकडून अद्याप निधी मिळाला नाही.