लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:19 AM2018-11-15T00:19:32+5:302018-11-15T00:19:59+5:30

आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

 69% of the water resources in the mini-project | लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठा फटका बसला. तर आता रबीची आशाही माळवली आहे. पाणी नसल्याने कोरडवाहू शेतीतील शेतकºयांना तर हरभरा, करडईसारख्या पिकांनाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात म्हणजे जून ते आॅक्टोबरदरम्यान ८८४ मिमी सर्वसाधारण पावसाचे प्रमाण असते. मात्र ६८४ मिमी पर्जन्य झाले. हे प्रमाण ७७.३0 टक्के आहे. गतवर्षीही ६३९ मिमीच पाऊस झाला होता. हे प्रमाण ७१ टक्के होते. त्यामुळे सतत दुसºया वर्षी पावसाने जिल्ह्याला दगा दिलेला आहे. असे असले तरीही आॅगस्ट महिन्यात तेवढा एकदाच मोठा पाऊस झाला होता. या पावसामुळे पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी ओसंडून वाहात होते. तर बहुतांश लघुप्रकल्प याच पावसामुळे तुडुंब झाले. मात्र नंतर पावसाचा पत्ता नसल्याने असाच ३0 टक्क्यांपर्यंत अनेक ठिकाणचा जलसाठा घटला आहे. तर काही ठिकाणी उपशाचा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात पारोळा-७४ टक्के, वडद-७0 टक्के, चोरजवळा-७४ टक्के, हिरडी-५२ टक्के, सवड-७0 टक्के, पेडगाव-७२ टक्के, हातगाव-६७ टक्के एवढा जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यात सवना ७५, पिंपरी-५५, बाभूळगाव-७६, घोडदरी-२५, औंढा तालुक्यातील वाळकी- ६३, सुरेगाव-४६, औंढा-९२, सेंदूरसना-७४, पुरजळ-६८, वंजारवाडी-७७, पिंपळदरी-७७, काकडदाभा-७३, केळी-६६ टक्के तर कळमनुरी तालुक्यात कळमनुरी-७0, बोथी-९२, दांडेगाव-८४, देवधरी-७४, वसमत तालुक्यातील राजवाडी-७६ तर पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावात ८७ टक्के जलसाठा असल्याचे अहवालात दिसते.
चार कोल्हापुरी बंधाºयांमध्ये एकूण ५६ टक्के जलसाठा आहे. यात चिंचखेडा-५७ टक्के, खेर्डा-२२ टक्के, खोलगाडगा-४२ टक्के तर राहाटीत वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे सध्या १00 टक्के जलसाठ्याची नोंद असल्याचे दिसून येत आहे.
यंदा धरणांचे चित्र मात्र विदारक आहे. इसापूर धरणात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा असला तरीही येलदरी धरणात ८.८0 टक्केच जलसाठा उरला. सिद्धेश्वरमध्ये तर अवघा २.७४ टक्के जलसाठा असून हे धरण मृतसाठ्यात जाण्यात आहे.
पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर लघुप्रकल्पांसह कोणत्याही जलसाठ्यात पाणीउपसा करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनास आदेश दिले होते.

Web Title:  69% of the water resources in the mini-project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.