जिल्ह्यात ६९१ गावे कोरोनामुक्त; २० गावे अजूनही हॉटस्पॉट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:37+5:302021-08-18T04:35:37+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असला तरी अजूनही धोका कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे ...
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असला तरी अजूनही धोका कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक असून मास्कचा वापर करावाच लागणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १६ हजार २० रुग्ण आढळले. त्यापैकी १५ हजार ६१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या केवळ १४ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रोखण्यात यश आले आहे. असे असले तरी बहुतांश नागरिक गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळत आहे. ग्रामीण भागातही कोरोना लसीकरणासाठी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना लस घेणे आवश्यक बनले आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप धोका कायम आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच सध्या वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन, वैद्यकीय अधिकारी डाॅ. देवेंद्र जायभाये यांनी केले आहे.
दररोज ५०० चाचण्या
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी आरोग्य विभागाच्या वतीने दररोज सरासरी ५०० जणांच्या काेरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ७ हजार ५९१ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या पाॅझिव्हिटी दर ७.७२ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सावधान, या गावांत पॉझिटिव्ह
तालुका गावे
हिंगोली आठरवाडी (नर्सी), अंधारवाडी, कारवाडी
कळमनुरी ढोलक्याची वाडी