७० गावे पूरनियंत्रण रेषेत; बचावासाठी ५ बोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:31+5:302021-06-29T04:20:31+5:30

हिंगोली जिल्ह्यात कयाधू, पैनगंगा व पूर्णा या तीन प्रमुख नद्यांसह आसना नदीमुळेही काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते. शिवाय इतर ...

70 villages under flood control line; 5 boats will be provided for rescue | ७० गावे पूरनियंत्रण रेषेत; बचावासाठी ५ बोटी मिळणार

७० गावे पूरनियंत्रण रेषेत; बचावासाठी ५ बोटी मिळणार

Next

हिंगोली जिल्ह्यात कयाधू, पैनगंगा व पूर्णा या तीन प्रमुख नद्यांसह आसना नदीमुळेही काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते. शिवाय इतर काही नाल्यांचाही नजीकच्या गावांना फटका बसत असतो. मागील दोन वर्षांत पुन्हा चांगला पर्जन्य होत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यात बचावासाठी काळजी घेतली जात आहे. त्यापूर्वी सातत्याने दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला फारसी तयारी करण्याची गरजच पडली नव्हती. मागील दोन वर्षांपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला बोटी खरेदीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या खरेदी न केल्याने आता राज्य कक्षाकडूनच या साहित्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिंक सरासरीच्या १२४ टक्के पर्जन्य झाले. दोन ते तीन वेळा जिल्ह्यात नदी, नाले दुथडी भरून वाहिले होते. कुरुंद्यात पाणी घुसले होते. तर कयाधू काठच्या काही गावांना पाण्याचा वेढा पडला होता. मात्र, तो जास्त काळासाठी नव्हता. त्यामुळे बचावकार्य साहित्याचा वापर आपल्याकडे करण्यातच आला नाही.

सध्या उपलब्ध साहित्य

हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सध्या ५० लाईफ जॅकेट, ५० लाईफ ब्युओज, १५ सर्च लाईटस, १ लाईट वेट चेन सॉ, १२ हेल्मेट, ३ टेंट, १ मल्टिगॅस डिटेक्टर, १० फायर एक्सटिंगुशर, कॉन्स्ट्रेट कटर १, गमबूट वीथ स्टिल १०, लायटनिंग टॉवर २, मोटर बोट वीथ ओबीएम २, मेगाफोन ५, फर्स्ट एड बॉक्स १८, पोर्टेबल वॉटर टँक ५, रोप रेस्क्यू किट १, पोर्टेबल जनरेटर २, फ्लोटिंग पंप १, कोम्बी रेस्क्यू टूल किट १ एवढे साहित्य उपलब्ध आहे.

अशी आहेत पूररेषेतील गावे

कयाधू नदीवर हिंगोली तालुक्यात समगा, दुर्गधामणी, धानापूर, सागद, पातोंडा, कळमनुरी तालुक्यात शेवाळा, कोंढूर, येलकी, बिबथर, नांदापूर, डोंगरगाव पूल, धारधावंडा, कसबे धावंडा, कान्हेगाव, फुटाणा, येगाव, टाकळगव्हाण, सेनगाव तालुक्यात सेनगाव, कोळसा, गुगुळ पिंपरी, कोंडवाडा अशी एकूण २२ गावे पूरप्रवण आहेत.

पैनगंगा नदीवर हिंगोली तालुक्यात भातसावंगी, दुर्गसावंगी, सावरगाव बं., हिरडी, मोप, कन्हेरगाव नाका, वांझोळा, खेड, महादेववाडी, पारडा, सेनगाव तालुक्यात भगवती, तपोवन, सूरजखेडा, सवना, मन्नास पिंपरी, पार्डी पोहकर, वायचाळ पिंपरी, तपोवन, गारखेडा ही १९ गावे पूरप्रवण आहेत.

पूर्णा नदीवर औंढा तालुक्यात पोटा बु. व खु., अनखळी, माथा, टाकळगव्हाण, पेरजाबाद, नालेगाव, तपोवन, रुपूर, सेनगाव तालुक्यात धानोरा बंजारा, वझर खु., वसमत तालुक्यात सोन्ना त.हट्टा, ब्राह्मणगाव बु., व खु., सावंगी बु., ढवूळगाव, माटेगाव, पिंपळगाव कुटे, परळी अशी १९ गावे पूरप्रवण आहेत.

विविध ठिकाणी मोठ्या नाल्याच्या शेजारील गावांमध्ये कळमनुरी तालुक्यात डिग्रस, सेनगाव तालुक्यात केंद्रा बु., वसमत तालुक्यात आरळ, वसमत, कुरुंदा, धामणगाव, खांडेगाव, आसेगाव, कानोसा, जवळा बु. या १० गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची भीती असते.

औंढ्यात सर्वांत कमी गावे

हिंगोली व कळमनुरीला दोन नद्यांची सर्वांत जास्त लांबी आहे. तर सेनगावला जवळपास तिन्ही नद्यांचा फटका बसतो. त्यात हिंगोली १५, कळमनुरी १४, सेनगाव १६, वसमत १६ व औंढा ९ अशी तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या आहे.

Web Title: 70 villages under flood control line; 5 boats will be provided for rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.