जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:09 AM2018-05-31T01:09:54+5:302018-05-31T01:09:54+5:30
विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.
हिंगोली जिल्ह्यात एकूण २० राष्टÑीयीकृृत बँका अ असून त्यांच्या जवळपास ११0 शाखा आहेत. या सर्व बँकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला़ दरम्यान, इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शहरातील मुख्य मार्गावरुन मोर्चा काढून बँकेच्या मागण्यांसाठी वेतन आयोगाला गती व भरीव वाढीची दाद मागण्यासाठीही एल्गार केला. मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाºयांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़ संपामध्ये जवळपास जिल्ह्यातील ५०० च्या वर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हिंगोली येथे नितीन घुगे, निखिल पांडे, जयबीर सिंग, मदन कुमार, ए. सी. दीक्षित, कल्पना डफळे, रजनीकांत निंबाळकर, साई गणेश आंबेकर, अशोक मोरे, एस. एम. कोल्हे, विजय कावरखे, जी. डी. मुलंगे, मदन रटनालू आदी कर्मचाºयांचा सहभा होता.
बँकांचे व्यवहार विस्कळीत
राष्टÑीयकृत बँका बंद असल्यातरी स्थानिक बँकाचे व्यवहार सुरु होते. मात्र त्या बँकांच्याही व्यवहारावर मोठा परिणाम झाला होता. आरटीजीएस, ट्रान्सफर, चेक क्लिअरसन्स या सेवा विस्कळीत झाल्या होत असल्याने मात्र ग्राहकांची एकच धावपळ उडत होती. आता ३१ मे रोजीही संप राहणार असल्याने ग्राहकांची तर चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता दिसून येत आहे.
औंढा : येथील राष्टÑीयीकृत बँकेचे कर्मचारी, बँक कर्मचारी युनियनच्या वतीने दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी झाल्याने दिवसभर बँका कुलूपबंद होत्या. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी बँकेत आलेल्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. बँक आॅफ महाराष्टÑ, ग्रामीण महाराष्टÑ बँक, इंडिया बँक, एसबीआय अशा विविध राष्ट्रीय बँकांच्या शाखा येथे आहेत. बुधवारी या सर्व बँकेचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बँकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते. आज संपाचा पहिला दिवस असून पगारवाडीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारीही बँका बंद राहणार असल्याने व्यवहार ठप्प झाले.