७४ हजार ५७४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:19+5:302021-01-17T04:26:19+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या २१४ मतदान केंद्रांवर शुक्रवारी झालेल्या मतदानावेळी मतदारांत मोठा उत्साह दिसून आला. ...
औंढा नागनाथ : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या २१४ मतदान केंद्रांवर शुक्रवारी झालेल्या मतदानावेळी मतदारांत मोठा उत्साह दिसून आला. ९१ हजार ६०६ मतदारांपैकी ७४ हजार ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ११३४ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी निकाल घोषित होणार आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी १७ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने ७१ ग्रामपंचायतींच्या ५०८ जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात ३५ हजार २२४ महिलांनी, तर ३९ हजार ३५० पुरुषांनी मतदान केले. एकूण ७४ हजार ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता सर्वांच्या नजरा १८ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. शुक्रवारी उशिरा मतपेट्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून, कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ज्या ठिकाणी आवेदनपत्र स्वीकारले त्याच २३ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधीला ओळखपत्र दिले जात आहे. ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी सांगितले.