७४ ग्रा. पं. बिनविरोध; उर्वरित जागांसाठी ७८६१ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:45+5:302021-01-08T05:36:45+5:30

हिंगोली जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. यापैकी ६२ बिनविरोध झाल्या. यात औंढा १६, सेनगाव १६, हिंगोली १७, वसमत ९ ...

74g Pt. Unopposed; 7861 candidates for the remaining seats | ७४ ग्रा. पं. बिनविरोध; उर्वरित जागांसाठी ७८६१ उमेदवार

७४ ग्रा. पं. बिनविरोध; उर्वरित जागांसाठी ७८६१ उमेदवार

Next

हिंगोली जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. यापैकी ६२ बिनविरोध झाल्या. यात औंढा १६, सेनगाव १६, हिंगोली १७, वसमत ९ व कळमनुरी १६ अशी संख्या आहे. तर उर्वरित जागांसाठी औंढा १२०९, वसमत १८७८, कळमनुरी १६२७, सेनगाव १५९९, हिंगोली १५४८ असे उमेदवार आहेत. हिंगोली- ३४५, वसमत- ४७२, कळमनुरी- ४५९, सेनगाव- ४२४, औंढा- १३३ अशी माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे. या निवडणुकीसाठी १०११७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी, माघारीनंतर ७८६१ जण रिंगणात उरले आहेत.

आता चिन्ह वाटपाची प्रक्रियाही पार पडली असल्याने ग्रामीण भागात प्रचाराची राळ उठणार आहे. चिन्हाचे वाटप झाल्याने आता उमेदवारांनाही आपले चिन्ह सांगून प्रचार करणे सोपे जाणार आहे. पॅनलप्रमुखांनाही आता गावात नुसती चर्चा नव्हे, खर्चाही करावा लागणार आहे.

कपबशी, पतंग, गॅस, खटारा चिन्हांना सर्वाधिक मागणी

ग्रा.पं. निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचेही मोठे महत्त्व असते. ग्रामीण जनतेला लक्षात राहण्यासारखे चिन्ह मिळावे तसेच ज्या चिन्हांचा विधानसभा, लोकसभेतही बहुतेकवेळा वजनदार अपक्षांनी वापर केला अशा चिन्हांना मागणी होती. कपबशी, पतंग, खटारा, गॅस आदी चिन्हांचा यात समावेश आहे. मात्र, आधी अर्ज करणाऱ्यांनाच ते मिळाले.

हिंगोलीत १७ ग्रा. पं. बिनविरोध

हिंगोली तालुक्यात हिंगणी, खेड, लासीना, दाटेगाव, आमला, नांदुरा, गाडीबोरी, जांभरुण तांडा, आंबाळा, खेर्डा, वैजापूर, बोराळा, भांडेगाव, साटंबा, बोडखी, नवलगव्हाण, जामठी खु., या १७ ग्रा. पं. बिनविरोध झाल्या. तर १७ ग्रा. पं. च्या ६२ प्रभागांत १८६ उमेदवार बिनविरोध आले. वसमत तालुक्यात माळवटा, वाघी, तेलगाव, रायवाडी, माटेगाव, दगडगाव, राजापूर, बाभूळगाव, टाकळगाव या ९ ग्रा. पं. बिनविरोध झाल्या.४७ प्रभागात १७९ जण बिनविरोध झाले.

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यातच अनेक ठिकाणी आरक्षणाच्या जागांवर पुरुषांऐवजी महिलाच उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. औंढ्यात १२०९ पैकी ७१२ महिला आहेत. अशीच परिस्थिती काहीशी इतर तालुक्यांमध्येही आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिलांचाच बोलबाला राहणार असल्याचे दिसत आहे.

हिंगोली तालुक्यात १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रा. पं. साठी निवडणूक होणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करूनच प्रचार करावा. कायदेशीर चाैकटीचे पालन करावे. प्रशासनाकडून मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू झाली असून प्रत्येक ग्रा. पं. साठी वेगवेगळ्या मतपत्रिका राहणार आहेत.

-पांडुरंग माचेवाड, तहसीलदार, हिंगोली

Web Title: 74g Pt. Unopposed; 7861 candidates for the remaining seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.