कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:15 AM2019-03-05T00:15:07+5:302019-03-05T00:15:29+5:30

कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.

 7700 beneficiaries of debt waiver | कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

Next

विजय पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.
हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करूनही अनेकांना मागील दोन वर्षांपासून त्याचा लाभ मिळाला नसल्याची बोंब आहे. तर काहींनी जुने अर्जच वाया गेल्याने नव्याने अर्ज केलेले आहेत. ३0 जून २0१८ पर्यंत या योजनेत ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६0 कोेटींची कर्जमाफी झाल्याचे सांतिले जात होते. तर त्यावेळी ६0 हजार ९२२ शेतकºयांच्या खात्यावर २३९ कोटी रुपये जमा झाले होते. तर २ हजार १४५ शेतकºयांचे १६ कोटी २२ लाख रुपये खात्यावर जमा होणे बाकी होते.
यानंतर मध्येच शासनाने कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याला दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पूर्वी ज्यांनी अर्ज केले नाही, अशांना नव्याने आस लागली होती. १0 आॅगस्ट २0१८ चा हा निर्णय होता. मात्र त्याचे अर्ज कधी व कसे करायचे, याची काहीच माहिती नव्हती. नंतर यात माहिती संकलित करण्यासाठीही सूचना न आल्याने बराच काळ हा आदेश बस्त्यात होता. मात्र शेतकºयांना अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ६६ हजारांवरून लाभार्थीसंख्या ७३ हजारांवर गेली. तर कर्जमाफीचा लाभ २६२ कोटींवरून ३२७ कोटींवर गेला आहे. मात्र प्रत्यक्षात ७७00 शेतकºयांच्या खात्यावर रक्कमच जमा होणे बाकी आहे. अजूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतकºयांना बँक खात्यावर रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळायची काहीच सोय नाही. मुंबईतून हा कारभार चालतो. त्यामुळे स्थानिक अधिकारी हैराण आहेत. बºयाच जणांनी तर या कर्जमाफीची आशा सोडली आहे. तर दुसरीकडे ७३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले जात असल्याने नेमके घोडे कुठे पेंड खातेय? हे कळायला मार्ग नाही. अशा यंत्रणेची गरज आहे.
पूर्वीच्या ६६ हजार लाभार्थ्यांहून आता ७३ हजारांवर लाभार्थीसंख्या गेली. यामये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २४ हजार २३३ जणांना ३0.0८ कोटींची कर्जमाफी झाली. २0 हजार ८५२ जणांना २५ कोटींचा लाभ मिळाला. ३३८१ जण शिल्लक आहेत. राष्ट्रीयकृत बँकांत ३९१११ जणांना २४0 कोटींची कर्जमाफी झाली. ३७६३९ जणांच्या खात्यावर २0३ कोटी गेले. १४७२ जणांचे ३७ कोटी शिल्लक आहेत. तर ग्रामीण बँकेत १0३३२ जणांना ५७.२२ कोटींची कर्जमाफी झाली. ७४८५ जणांच्या खात्यावर ३९.३९ कोटी गेली. २८४७ जण शिल्लक आहेत.
कर्जमाफीतील ७७00 जणांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही विविध कारणांनी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ५९.९९ कोटींचा लाभ मिळणार आहे. रक्कम खात्यावर कधी येणार? हा प्रश्न आहे.

Web Title:  7700 beneficiaries of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.