कोरोनाचे नवे ७८ रुग्ण; ५ जण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:32+5:302021-05-15T04:28:32+5:30
बरे झाल्याने आज १३३ जणांना डिस्चार्ज दिला. यात हिंगोली ७४, कळमनुरी ६, औंढा ४९ तर सेनगावातून ४ रुग्ण सोडले. ...
बरे झाल्याने आज १३३ जणांना डिस्चार्ज दिला. यात हिंगोली ७४, कळमनुरी ६, औंढा ४९ तर सेनगावातून ४ रुग्ण सोडले. आजपर्यंत जिल्ह्यात १४ हजार ६९० रुग्ण आढळले. यापैकी १३६९० बरे झाले. तर ६९५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी ३३०जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर तर अतिगंभीर ३३ बायपॅपवर आहेत.
छतावरून उडी घेणऱ्याच्या आजोबाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात आज पाच जण कोरोनाने दगावले. यात जिल्ह रुग्णालयात कळमनुरी येथील ७० वर्षीय पुरुष, पाटोदा येथील ५२ वर्षीय महिला, समगा येथील ७० वर्षीय पुरुष या तिघांचा मृत्यू झाला. कळमनुरीत कोंढूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनात सर्वात कमी वयाच्या म्हणजे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू औंढा रुग्णालयात झाला. तो अंजनवाडा येथील होता. तर समगा येथील दगावलेला वृद्ध हा कोविड वार्डाच्या छतावरून उडी घेतलेल्या तरुणाचा आजोबा आहे.