ऑनलाइन स्पर्धेत ७९ शिक्षिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:32+5:302021-07-15T04:21:32+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, परसराम पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ ...
मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, परसराम पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलैला या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील ७९ शिक्षिकांनी सहभाग नोंदविला. यात कृतियुक्त मनोरंजक बडबडगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्राथमिक वर्गामध्ये बालगीतांना व बडबडगीतांना अनन्यसाधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांचे रंजन करून त्यांना विषयघटक समजावून सांगण्यासाठी, त्यास शाळेत टिकवण्यासाठी बडबडगीते महत्त्वाचे साधन आहे. बडबडगीतांचे हे महत्त्व लक्षात घेता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. सादरीकरणाचे परीक्षण महाराष्ट्र राज्यातील तज्ज्ञ परीक्षकांकडून होत आहे.
परीक्षक म्हणून कवयित्री सुप्रिया इंगळे, गीतकार शिवाजी कराड, अनिता जावळे, संघशील रोकडे हे ऑनलाइन उपस्थित होते. सूत्रसंचालन बालाजी काळे, दीपक कोकरे यांनी केले. तांत्रिक व्यवस्थापन विजय बांगर, महेश बोधने व सुमित यन्नावार यांनी केले.