हिंगोलीत कर्जमाफीचे ८0 कोटी खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:00 AM2017-12-28T00:00:07+5:302017-12-28T00:00:12+5:30
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतकºयांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतक-यांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतक-यांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतक-यांनी रांगा लावल्या होत्या. १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज भरले होते. त्यापैकी दुबार किती हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र ज्यांनी अर्ज भरले त्यातील अनेकांच्या अर्ज व बँकेच्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याचे निदर्शनास येत असल्यास असे अर्ज तूर्त बाजूला ठेवले आहेत. या सर्व अर्जदारांची यादी बँकांना पाठविली जाणार आहे. बँका ही यादी आपल्या नोटीस बोर्डावर डकवतील. त्यानंतर यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा शेतकºयांना रांगा लावून बँकेत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर ही यादी पुन्हा तालुकास्तरीय समितीकडे जाणार आहे. या समितीकडून पडताळणी झाल्यानंतरच संबंधित शेतकºयांच्या कर्जमाफीचे भवितव्य ठरणार आहे.
येत्या पंधरा दिवसांत या शेतकºयांच्या याद्या मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच यात खºया अर्थाने कर्जमाफीपासून वंचितांचा आकडा समोर येणार आहे. मात्र ही वेळखाऊ प्रक्रिया ठरत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ हजार १00 लाभार्थ्यांचे २३.८९ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या १0 हजार ३११ शेतकºयांचे ६२.१४ लाख, तर ग्रामीण बँकेच्या ४७२0 खातेदार शेतकºयांचे २९.८२ कोटी रुपये कर्जमाफीत प्राप्त झाले आहेत.
यात मध्यवर्तीचे १७ ६६३ जणांचे २३.३१ कोटी, राष्ट्रीयकृतचे ५६९६ जणांचे ३४.७७ कोटी तर ग्रामीण बँकेत ४0५२ जणांचे २३.६९ कोटी असे ८0.७८ कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत.
रबी हंगाम : ६.२३ टक्के कर्जवाटप
यंदाच्या रबी हंगामासाठी शेतकºयांना अवघे ९.७२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यंदा शेतकºयांना कर्जमाफीची आस लागल्याने खरीप हंगामात अनेकांनी कर्ज घेणे टाळले होते. मात्र रबी हंगामापूर्वी या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असता तर अनेकांना रबीसाठी आवश्यक कर्ज घेणे शक्य होत होते. तसेही यंदा चांगले पर्जन्य नसल्याने रबीचा पेरा घटला अन् आहे ते पीकही फारसे चांगले नाही. रबीत जि.म.स.ने कर्ज वाटलेच नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी ५२८ जणांना ८.0५ कोटी तर ग्रामीण बँकेने ३६८ जणांना १.0६ कोटी रुपये वाटले.