९३ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:14 AM2017-08-01T00:14:28+5:302017-08-01T00:14:28+5:30

यापूर्वी लिलावात गेलेल्या घाटांना सप्टेंबरपर्यंत मुदत असली तरीही पुढील वर्षासाठी वाळू घाट लिलावाची प्रक्रिया करण्यास ९३ घाटांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यंदा एकही मोठा पाऊस झाला नाही. तर गेल्यावर्षी अवघे १४ घाटच लिलावात गेले होते.

9 3 Survivors of surcharged surveys | ९३ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू

९३ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यापूर्वी लिलावात गेलेल्या घाटांना सप्टेंबरपर्यंत मुदत असली तरीही पुढील वर्षासाठी वाळू घाट लिलावाची प्रक्रिया करण्यास ९३ घाटांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यंदा एकही मोठा पाऊस झाला नाही. तर गेल्यावर्षी अवघे १४ घाटच लिलावात गेले होते.
गेल्या वर्षी कंत्राटदारांनी वाळू लिलावातून अंग काढून घेतले होते. त्यामुळे जवळपास ४0 घाट लिलावासाठी उपलब्ध असताना केवळ १४ घाट लिलावात गेले होते. त्यात २.२४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र प्रशासनाला अपेक्षित महसूल न आल्यामुळे अवैध वाळू उपसा होणार नाही, यासाठी अनेक वाहने पकडण्यात आली होती. परंतु ज्या घाटांचा लिलावच झाला नाही. त्या ठिकाणाहून मात्र अवैध वाहतूक सुरूच होती. ती रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करूनही त्यात बव्हंशी यश येत नव्हते. त्यामुळे वाहने पकडून त्यांचा लिलाव करण्यात येईल, अशा कठोर स्वरुपाच्या नोटिसाही बजावल्या होत्या. तर दंडाची रक्कमही वाढविली होती. हिंगोलीत ९ प्रकरणांत ३.६४ लाख, सेनगावात ३ प्रकरणांत १.२१ लाख, कळमनुरीत ९ प्रकरणांत ३.८९ लाख, वसमतला १९ प्रकरणांत १२.१३ लाख, औंढ्यात १९ प्रकरणांत ९.४१ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. एकूण ५९ प्रकरणांत ३0.२८ लाखांचा दंड वसूल झाला आहे. ही मागील महिन्यापर्यंतची आकडेवारी आहे.
यंदा कळमनुरी तालुक्यातील वाळू घाटांचे सर्वेक्षण झाले असून हिंगोलीतील घाटांचे भूजल व पर्यावरणचे हे संयुक्त सर्वेक्षण सुरू आहे. सप्टेंबरनंतर हे घाट लिलावात जाणार आहेत.

Web Title: 9 3 Survivors of surcharged surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.