हिंगोलीत तब्बल ९ कोरोना रुग्ण दगावले; २९१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:13+5:302021-04-20T04:31:13+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात रिसाला बाजार १, खांबाळा १, गवळीपुरा १, लाख १, वसमत १, वापटी १, गणेशपूर १, ...

9 corona patients killed in Hingoli; 291 new patients | हिंगोलीत तब्बल ९ कोरोना रुग्ण दगावले; २९१ नवे रुग्ण

हिंगोलीत तब्बल ९ कोरोना रुग्ण दगावले; २९१ नवे रुग्ण

Next

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात रिसाला बाजार १, खांबाळा १, गवळीपुरा १, लाख १, वसमत १, वापटी १, गणेशपूर १, वसमत १, पेन्शनपुरा १, वरखेडा २, वडद १, सवना १, सिरसम २, पहेनी १, राजापूर औंढा १, जयपूर १, श्रीनगर १, तलाब कट्टा १, आझम कॉलनी १, नर्सी १, जि.प.क्वार्टर्स १, सालेगाव १, जिजामातानगर १, एसआरपी १, तिरुपतीनगर १ असे २७ रुग्ण आढळले. वसमत परिसरात गिरगाव ३, डोणगाव १, कुुरुंदवाडी १, बोराळा ६, कुरुंदा १, सोमवारपेठ १, लिंगी १, हाजी मोहल्ला १, मालेगाव रोड १, मुरी रोड १, आसेगाव २, मुुरुंबा १, आंबा चोंढी ३, पाटीलनगर १, थोरावा २, नवीन कॉलनी १, सती पांगरा २, कौठा रोड २, नागसेनगर २, सिद्धर्थनगर १, वसमत १, चौधरीनगर २, बुधवारपेठ १, बुरगेन१, पार्डी खु. १, विद्यानगर १, मंगळवारपेठ १, गुंज २, मामा चौक १, बुधवारपेठ १, पिंपळा चौरे २, सहारा पेठ २, भोरीपगाव १, वाखारी १, कारखाना रोड २, जयनगर २, रिलायन्स पेट्राेलपंप १, श्रीनगर १, धामणगाव १, गणेशपूर १ असे ६० रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात खुडज २, पुसेगाव २, भानखेडा २, सुकळी २, बेलथर १, सेनगाव २, लिंबाळा १, बाभूळगाव १, पिंपरी २९ असे एकूण ४२ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा ५, वारंगा फाटा १, सुकळी वीर २, बाळापूर ४, शेवाळा १, उमरडा १ असे १४ रुग्ण आढळले. सोमवारी बरे झालेल्या १७२ जणांना घरी सोडले. यात जिल्हा रुग्णालयातून ५५, वसमत २२, कळमनुरी ५५, औंढा २२ तर सेनगावातून १८ सोडले.

९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

हिंगोली जिल्हा रुग्णालयात निवघा बाजारचा ६० वर्षीय पुरुष दगावला. कळमनुरी रुग्णालयात कळमनुरीचा ५८ वर्षीय पुरुष, वारंगा येथील ४५ वर्षीय महिला, चुंचा येथील ५८ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिलेचा मृतांत समावेश आहे. द्वारका हॉस्पिटल येथे धनगरवाडी येथील ८० वर्षीय पुरुष दगावला. नवीन कोरोना रुग्णालय हिंगोली येथे सालेगावची ८० वर्षीय महिला, रुपूर येथील ४२ वर्षीय पुरुष, गोरेगाव येथील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आजपर्यंत १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गंभीर रुग्णांची संख्या ३६२

आजपर्यंत एकूण १० हजार २९४ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ८७८१ बरे झाले. सध्या १३५३ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ऑक्सिजनवर ३४० जण असून अतिगंभीर असलेल्या २२ जणांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 9 corona patients killed in Hingoli; 291 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.