महसूलने गाठले ९0 टक्के उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:17 AM2018-03-22T00:17:56+5:302018-03-23T12:08:02+5:30
यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दिवसांत दहा टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दिवसांत दहा टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा वाळू कंत्राटदारांनी वाळू लिलावावर जणू बहिष्कारच घातल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा महसूलच्या उद्दिष्टपूर्तीचे घोडे अडेल असे दिसत होते. मात्र महसूल प्रशासनाने सर्व अडचणींवर मात करून उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल केली आहे. यामध्ये जमीन महसूलचे उद्दिष्ट ५.५८ कोटी रुपये होते. तर प्रशासनाने ५.६४ कोटींची वसुली केली. गौण खनिजाचे २१ कोटींचे उद्दिष्ट होते. तर १७.६९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यात एकच वाळू घाट लिलावात गेला होता. त्यातून ५0 लाखही वसूल झाले नव्हते. मात्र वाळू उत्खननाच्या दंडातूनच सव्वा कोटी वसूल झाले होते. यंदा वसमत व कळमनुरी तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टी आदीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. इतर लेखाशिर्षांची वसुलीही ६४.५९ टक्के झाली आहे. त्यामुळे एकूण वसुलीचा आकडा २३.९८ कोटींवर गेला आहे. तर उद्दिष्ट २६.५८ कोटींचे आहे. आता शेवटच्या आठ दिवसांत उद्दिष्टपूर्तीसाठी कमालीचे प्रयत्न केले जात असून महसूल न भरल्यास कारवाईही केली जात आहे.
औंढा नागनाथ : अकृषिक कराचे १८ हजार न भरणाºया महावितरणच्या उपविभागालाच महसूलच्या वसुली पथकाने बुधवारी दुपारी सील ठोकले आहे. मार्चएण्डचा वसुलीचे ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कट करणाºया कार्यालयाची अशी अवस्था झाल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.
महसुली वसुली करण्यासाठी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमली आहेत. नायब तहसीलदार केशव वीरकुंवर यांनी महावितरणला नोटीस देऊनही फायदा होत नव्हता.
मंडळाधिकारी आनंद शिंदे, तलाठी माणिक रोडगे, ए.आर. मेश्राम, महंमद, शे. मुजीद, एस.एम. राठोेड, यू.बी. सोमठकर, जे.बी. दराडे यांनी दुपारी ४ च्या सुमारास कर्मचाºयांना कार्यालयाबाहेर काढून हे सील ठोकले