जिल्ह्यातील ९६८५ कोरोना योद्धयांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:21+5:302021-05-15T04:28:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे. ज्यांचा दुसरा डोस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे. ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे आणि कालावधी पूर्ण झाला असेल तर त्यांनी नजीकच्या केंद्रावर जावून लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी ६ हजार ७८१ (खासगी आणि सरकारी), फ्रंटलाईन वर्कर १० हजार ८५८ (सरकारी) यांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच ४५ ते ६० वर्षांवरील २३ हजार ६१४ जणांना पहिला डोस तर ७ हजार ६६१ जणांना पहिला डोस दिला आहे. ६० वर्षांवरील ३४ हजार ६८२ जणांना पहिला डोस तर १० हजार २४९ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस संपले होते. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. जिल्ह्यातील ३३ केंद्रांपैकी चारच केंद्रांवर लसीकरण सुरु होते. कोविशिल्डचे २५ हजार ६०० तर कोव्हॅक्सिनचे ८ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सध्यातरी लसींची काही कमतरता नाही. ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे, त्यांना वेळेवर दिला जाईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.
किती लसीकरण?
आरोग्य कर्मचारी पहिला डोस ६७८१, दुसरा डोस ४३१२
फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस १०८५८, दुसरा डोस ३६४२
४५ ते ६० वर्षांवरील पहिला डोस २३६१४, दुसरा डोस ७६६८
६० वर्षांवरील पहिला डोस ३४४८२, दुसरा डोस १०२४९
कोणीही वंचित राहणार नाही...
जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस भरपूर प्रमाणात आली आहे. तेव्हा ज्या कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्यांनी लस दिली जाईल. तेव्हा त्यांनी काळजी करण्याचे काही एक कारण नाही. कालावधी पूर्ण झाला असेल तर नजीकच्या केंद्रावर जावून लस घ्यावी.
- प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी