नांदेड- हिंगोली मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 05:08 PM2023-09-11T17:08:30+5:302023-09-11T17:09:30+5:30
अपघात कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
- रमेश कदम
आखाडा बाळापूर (हिंगोली) : नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला. पिराजी वाघमारे असे मृताचे नाव असून अपघात नेमका कशाने झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.
डोंगरकडा येथील रहिवासी असलेले पिराजी वाघमारे हे दुचाकीवरून ( क्रमांक एम. एच . 38 वाय 5282 ) कळमनुरीकडे जात होते. दरम्यान, नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर टोल नाकाच्यासमोर साळवा शिवारात दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात वाघमारे जागीच ठार झाले.
माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. तसेच परिसरातील शेतकरी, प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून बीट जामदार शेख अन्सार घटनास्थळी पोहोचले. अपघात कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह बाळापूर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.