ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली

By यशवंत भीमराव परांडकर | Published: June 8, 2023 07:50 PM2023-06-08T19:50:51+5:302023-06-08T19:51:21+5:30

ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित बसची रस्त्यावरील वाहनांना धडक, यात एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी झाले

A brakefell bus killed one; But the tipper driver risked his life and stopped the bus... | ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली

ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली

googlenewsNext

- हबीब शेख
औंढा नागनाथ (जि. हिंगोली):
हिंगोलीवरून परळीकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून एका कारला पाठीमागून धडक दिली. यानंतर मोटारसायकलला धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील एक जण ठार, तर कारमधील सात जण जखमी झाले आहेत. यात दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

८ जून रोजी दुपारी २ वाजेदरम्यान परतवाडा येथून परळीकडे जाणाऱ्या बसचे औंढा ते हिंगोली रोडवर ब्रेक निकामी झाले. यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले. येथील एका लॉजसमोर कारला (क्र. एमएच ३० एटी १४७७) जोराची धडक दिली. यानंतर मोटारसायकल (क्र. एमएच ३८ एल ६६७०) ला धडक दिल्याने मोटारसायकल बसच्या पुढील भागात अडकली. जवळपास दोनशे मीटर मोटारसायकल फरफटत नेल्याने उमरदरी येथील मोटरसायकलस्वार संजय वामन जाधव (वय ३५) हा जागीच ठार झाला.

तर, त्यासोबत असलेले मारोती वामन जाधव (३२) व लहू संजय जाधव (१४) बाहेर फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. तर, कारमधील धम्मपाल गणपत पुंडगे (वय ४० रा. रुपूर), पार्वतीबाई गणपतराव पुंडगे (वय ५५ रा. रुपूर), रजनी विनय पुंडगे (१७ रा. रुपूर), श्रुती प्रेम धवसे (६, रा. औरंगाबाद), नर्मदा तुकाराम सातपुते (५२, रा. माथा), गजानन तुकाराम सातपुते (३८, रा. माथा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब खर्डे, दीक्षा लोकडे, जमादार रविकांत हरकळ, गजानन गिरी, मोहम्मद शेख, अमोल चव्हाण, किशोर परिस्कर, सय्यद बेग आदींनी भेट दिली व गर्दीला पांगविले.

बसच्या समोर टिप्पर केले आडवे...
ब्रेक फेल झालेल्या बसचा वेग अधिक होता. त्यामुळे ही बस कार व मोटारसायकलला धडक देऊन पुढे जातच होती. या दरम्यान समोरून येणाऱ्या टिप्पर चालकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने टिप्पर बसच्या समोर आडवे केले. त्यामुळे वेगात येत असलेली बस जागेवर थांबली. या बसमध्ये एकूण आठ प्रवासी होते. या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली नाही.

Web Title: A brakefell bus killed one; But the tipper driver risked his life and stopped the bus...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.