अतिउत्साह नडला! मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 01:47 PM2024-11-20T13:47:21+5:302024-11-20T13:54:31+5:30

याबाबत तरुणाच्या विरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against the young man after the video of voting went viral | अतिउत्साह नडला! मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल

अतिउत्साह नडला! मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल

- रमेश कदम 
आखाडा बाळापूर ( हिंगोली)
 : विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केल्याचा व्हिडिओ मतदान कक्षात तयार केला व एका व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याची घटना बाळापूर येथे उघडकीस आली. मतदानाची गोपनीयता बाळगणे, मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणे याबाबत तरुणाच्या विरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 9:15 वाजता आखाडा बाळापूर येथील एका मतदान केंद्रावर संतोष शिवाजी आमले या तरुणाने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन प्रवेश केला. तसेच मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने तयार केला. त्यानंतर मतदान यंत्र व मतदान केल्याचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर व्हायरल केला. 

माहिती मिळताच याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून सदर तरुणास ताब्यात घेतले आहे. बाळापूरचे पोलीस कर्मचारी अतुल विठ्ठलराव मस्के यांच्या फिर्यादीवरून हनुमान नगर येथील रहिवासी असलेला संतोष शिवाजी आमले ( रां. हनुमान नगर, आखाडा बाळापूर) याच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: A case has been registered against the young man after the video of voting went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.