पोलिसांची जबरदस्त मोहीम; अनेक वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या ४१ जणांना घेतलं ताब्यात

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 3, 2023 06:50 PM2023-05-03T18:50:37+5:302023-05-03T18:52:52+5:30

१४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत या पथकाने ४१ जणांना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले.

A forceful police operation; 41 people who gave gungara were arrested in one night and produced in court | पोलिसांची जबरदस्त मोहीम; अनेक वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या ४१ जणांना घेतलं ताब्यात

पोलिसांची जबरदस्त मोहीम; अनेक वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या ४१ जणांना घेतलं ताब्यात

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेल्या व फरारी आरोपीस पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात १४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत तब्बल ४१ जणांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.

जिल्ह्यात अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यासंदर्भाने न्यायालयानी दिलेली तारीख चुकविणारे तसेच गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकामार्फत पाहिजे असलेले व फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे. पाहिजे असलेल्या व फरार अशा ५९ आरोपींना पकडण्यासाठी पथक कामाला लागले होते.

१४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत या पथकाने ४१ जणांना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले. उर्वरित पाहिजे व फरारी आरोपींना पकडण्यासाठीची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार कोंडिबा मगरे, प्रशांत नरडीले, हरिभाऊ गुंजकर, संजय फुफाटे यांच्या पथकाने केली.

Web Title: A forceful police operation; 41 people who gave gungara were arrested in one night and produced in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.