जवळाबाजारच्या एसबीआय बँकेच्या मॅनेजरने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 03:06 PM2023-02-02T15:06:29+5:302023-02-02T15:07:08+5:30
बेडरूममध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या
- अरुण चव्हाण
जवळा बाजार (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. प्रकाश यादवराव सरकटे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी हट्टा पोलिसात आकस्मीक मृत्यूची नोंद झाली आहे.
जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जवळाबाजार येथील शाखेत शाखा व्यवस्थापदावर कार्यरत असलेले प्रकाश सरकटे (रा. सागवान (गायरान) मुळचे बुलढाणा येथील आहेत. सध्या ते जवळाबाजार येथील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या घरात राहत. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता ताणतणावातून सरकटे यांनी मध्यरात्री बेडरूममध्ये झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती कळताच जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, पोलीस कर्मचारी सुरेश भारशंकर व बेले यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नी कल्पना प्रकाश सरकटे (रा. हल्ली मुक्काम शिक्षक कॉलनी जवळा बाजार) यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.