आमदारांना शिवीगाळ; गुन्हा नोंदविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:34 AM2018-12-04T00:34:24+5:302018-12-04T00:34:43+5:30
औंढा नागनाथ येथे शिवसेनेतर्फे २९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप करून ३ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेतली. तर यात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ येथे शिवसेनेतर्फे २९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप करून ३ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेतली. तर यात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आ. डॉ. संतोष टारफे यांना जाणीवपूर्वक शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केला. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष बोंढारे म्हणाले, आ.संतोष टारफे यांच्यावर सभेदरम्यान वापरलेली भाषा ही राजकीय वा टीकात्मक नसून खालच्या पातळीची आहे. जातीचाही जाणीवपूर्वक उल्लेख केल्याचे दिसत आहे. तर हे व्हॉटस्अॅपवर व्हायरल होत असून हे पाहूनही अनेकांनी बांगर यांचा निषेध केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, बाबा नाईक, बापूराव बांगर, सुरेशअप्पा सराफ, शेख नईम शेख लाल, विनायक देशमुख, धनंजय पाटील, शिवाजी मस्के, रवि पाटील, माणिक करडिले, शिवाजी शिंदे, गजानन देशमुख, शासन कांबळे, विलास गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदनही पोलीस अधीक्षक यांना दिले.
पायाखालची वाळू सरकली-बांगर
आ.संतोष टारफे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून पक्ष व जनतेच्या दारातही तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्यामुळे ते आता जनतेची सहानुभूती लाटण्यासाठी अॅट्रॉसिटीचे हत्यार उपसून स्वत:च्या राजकीय पुनर्वसनासाठी माझ्या हद्दपारीची तयारी करीत असल्याचा आरोप सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केला.