औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:54 PM2018-05-26T23:54:04+5:302018-05-26T23:54:04+5:30

वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्याद्वारे २३१ कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल. हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६९७ औद्योगिक वीजग्राहक आहेत.

 'Abhay Yojna' for industrial power consumers | औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्याद्वारे २३१ कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल. हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६९७ औद्योगिक वीजग्राहक आहेत.
राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरुपी खंडित केला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकार माफ केला जाईल. न्यायालयीन प्रकरण १२ वर्षांपेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी ही रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकांना १०० टक्के व्याजाची माफी मिळेल.
तसेच जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षांपर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली, अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्के व्याजमाफीची सूट मिळेल. यासर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे. ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख व धनादेशाच्या या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी आवाहन करण्यात आले.
अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावी. ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ ६६६ लिंकवर जावून ग्राहक क्रमांक, बिलिंग युनिट टाकल्यास योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. योजनेत १ जूनपासून ग्राहकांना सहभागी होता येणार आहे.

Web Title:  'Abhay Yojna' for industrial power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.